पुणे (वृत्तसंस्था) – ‘कौटुंबिक वादाचे प्रकरण मिटवण्यासाठी गॅंगस्टार छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे आणि तिच्या दोन साथीदारांनी संगनमत करून शहरातील एका व्यक्तीकडे 50 लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.छोटा राजनच्या पुतणी राजकिय पक्षाची महिला अध्यक्ष आहे. निकाळजेवर गुन्हा दाखल झाल्याने शहरभरात खळबळ उडाली आहे. 25 लांखाचा पहिला हप्ता स्विकारताना निकाळजेच्या साथीदार धिरज साबळेला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.