जळगाव ;- कोविड १९ च्या जगभरातील व देशातील साथीमूळे नैराश्याचे वातावरण निर्माण होत असतांना देशाच्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा संदेश देत देशातील जनतेला व विदयार्थ्यांना मानसिक सामाजीक,शैक्षणिक व व्यवसायिक मार्गदर्शन समुपदेशन व सहकार्य करण्याकरीता मनोदर्पण हया हेल्पलाईनची देशपातळीवर सूरूवात केली आहे.यात जळगाव येथील गोदावरी इग्लीश मिडीयम स्कुलच्या समुपदेशक लिना चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
२१ जूलै रोजी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयल हयांच्या हस्ते मनोदर्पण हेल्पलाईन व वेबपोर्टलची व मोफत समुपदेशनाकरीता राष्ट्रीय स्तरावर उदघाटन करण्यात आले. शारीरीक समस्याबरोबर मानसिक दृष्टया सृदृढ व्हावीत तसेच विदयार्थ्यांना विविध परिक्षा, विविध अभ्यासक्रमाची माहिती, प्रवेश मोफत प्राप्त करता यावी या करीता ही व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातील ६० तज्ञ समुपदेशक, मानसशास्त्रतज्ञ यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील दोन समुपदेशकांचा सहभाग व सन्मान मिळाला आहे. जळगाव येथील गोदावरी इग्लीश मिडीयम स्कुलच्या समुपदेशक लिना चौधरी तसेच चंद्रपूर येथील अनिल पेटकर हयांनी एमएचआरडी व्दारा निर्मीत मनोदर्पण हया पोर्टलवर विदयार्थ्यांनी व पालकांनी तसेच इतर नागरिकांनी संपर्क करून आपल्या शैक्षणिक व मानसिक समस्यांचे निराकरण करावे असे सुचवल आहे. त्याकरीता हया लिंकला क्लीक करून माहिती घ्यावी तसेच राष्ट्रीय टोल फ्री क्र ८४४८४४०६३२ वर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपय्रंत संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.








