पुणे (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प आहे. मात्र हातावर पोट असलेल्या कुटुंबाना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

शांताबाई पवार आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भागवण्यासाठी पुण्यातील रस्त्यावर लाठ्याकाठ्या फिरवत आहे. त्याचा या व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर अनेक लोक या आजीच्या मदतीसाठी पुढे आले. यातच आता शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः भेटणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात पुणे पोलिसांच्या भरोसा सेलच्या ज्येष्ठ नागरिक कक्षातर्फे 15 हजारांवर ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात आली. हाच उपक्रम आणखी पुढे नेत कसरती करून आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्याची वेळ आलेल्या शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः भेटणार आहेत. शांताबाई पवार यांची व्यथा ऐकल्यावर गृहमंत्र्यानी शनिवारी पुण्यात आज दुपारी एक वाजता हडपसर येथे प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरविले. गृहमंत्र्यांच्या संवेदनशीलत्यामुळे पोलिसांच्या भरोसा सेलला काम करण्यासाठी आणखी उमेद मिळेल.







