भोपाळ (वृत्तसंस्था) – देशभरात करोना व्हायरस थैमान घालत असून राजकीय व्यक्तीही या विळख्यात अडकत आहे. भाजप नेते व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विटरच्या माध्यमाने सांगितली आहे.

शिवराज सिंह यांनी ट्विटमध्ये म्हणाले कि, मला करोना व्हायरसची लक्षण आढळली आहेत. टेस्ट केल्यांनतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना टेस्ट करावी, अशी मी विनंती करतो. तसेच माझ्या जवळच्या लोकांनी क्वारंटाईनमध्ये राहावे, असे त्यांनी सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, मी करोनाच्या सर्व नियमांचे पालन करत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वतः क्वारंटाईनमध्ये आहे. छोटी चूकही करोनाला आमंत्रण देते. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी, अशी विनंती त्यांनी जनतेला केली आहे.







