पाचोरा (प्रतिनिधी) – येथील आशीर्वाद कॉटेज मधील १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

पाचोरा पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, दि.२२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अभय भगवान पाटील. (वय १८ रा. अंतुर्ली प्र. पा. ता. पाचोरा, ह. मु. आशिर्वाद कॉटेज, पुनगाव रोड, पाचोरा) याने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर तरुणास त्याचा भाऊ सुनिल पाटील याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यास मृत घोषित केले. तरुणाचे आत्महत्येचे कारण समजलेले नसून पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







