भुसावळ- येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात भाग ५, गुरनं. ०७३९/२०२० भादंवि. कलम-४५४,४५७,३८० प्रमाणे दि.१८ जुलै रोजी दाखल गुन्ह्यात तपासचक्रे फिरवून बाजारपेठ पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.
हनुमान नगरातील सुरेंद्र वाधवाणी यांचे मालकीची भुसावळ शहरातील मॉडर्न रोड वरील हरी ओम इलेक्ट्रॉनिक दुकानातून दि.१७ जुलै रोजी सायंकाळी ७
ते दि.१८ रोजी सकाळी ९-३० वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी दुकानाचे शटरला लावलेले कुलूप तोडून २ लाख २६ हजार ३५० रु.किमतीचा सामान चोरून नेला होता.या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयित फिरोज शेख अकिल गवळी(वय-२४) रा.जाममोहल्ला,मशिद जवळ व रज्जाक उर्फ राजा शेख रहीम (वय २८) रा.जाममोहल्ला या दोघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संदीप परदेशी,अनिल मोरे,पोना.रमण सुरळकर,रविंद्र बिऱ्हाडे,पोकाॅ. विकास सातदिवे,प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव,कृष्णा देशमुख यांनी केली.