भुसावळ;- खळवाडी, काशीराम नगर, जळगाव रोड विभागात जीनस कंपनीच्या चुकीमुळे ग्राहकांना अवाजवी बिले मिळाली त्यातच वारंवार शहरात अनियमित वीज पुरवठा महावितरण कडून होत होता म्हणून भुसावळातील महावितरणच्या अनागोंदी कारभाराबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ जुलै रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने व पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांना तक्रारी न सोडवल्यास महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता.
आज दिनांक २१ जुलै रोजी खळवाडी परिसरातील भरत दिनकर पाटील यांचे ४९०० रुपये काशीराम नगर भागातील लक्ष्मण पाटील यांच्या नावाने असलेल्या देयकात ८००० रुपये दुरुस्ती करण्यात आली. श्रीनगर भागातील टोपेश महाजन व प्रदीप हिरामण राणे यांना एक वर्षपासून दुसऱ्याच ग्राहकाचे वीज देयक दिले होते. त्यांची मीटर बदलवून देण्यात आली आहे तसेच अश्याच प्रकारे भुसावळातील ६०० ग्राहकांच्या मीटरची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या पुढे नियमित वीज पुरवठा केला जाईल असे लेखी आश्वासनाचे पत्र आज अभियंता व्ही.बी.पाटील यांनी शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख पवन नाले, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, विभागप्रमुख अमोल पाटील, लोकेश वाणी, सुरज चौधरी, कुमार भारंबे यांना दिले.
खंडित वीज पुरवठ्याची ठोस कारणे ग्राहकांना दिली पाहिजे, मेंटेनन्सची कामे करतांना ग्राहकांना मेसेज पाठवणे, दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करणे, विभागा निहाय तक्रार केंद्रे व संपर्क प्रसिद्ध करावे तसेच चुकी करणाऱ्या जीनस कंपनीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अश्या सूचना प्रा. धिरज पाटील यांनी केले आहे.