नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता पोलीस तपासाला वेग आला आहे. खूप कमी काळात अनेक बड्या लोकांची चौकशी करत पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता अशी माहिती आहे की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी YRF चे हेड आदित्य चोपडा यांची चौकशी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शनिवारी (18 जुलै) सकाळी मुंबई पोलिसांनी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आदित्य चोपडांचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी तब्बल 4 तास त्यांची चौकशी केली आहे. आदित्य यांना पोलिसांनी कोणते प्रश्न विचारले त्याची त्यांनी काय उत्तरं दिली याबद्दल अद्याप कोणतीही औपचारिक माहितीही समोर आलेली नाही. परंतु या प्रकरणी यश राज फिल्म्सचा अँगल महत्त्वाचा आहे एवढं मात्र नक्की आहे. कारण पोलिसांनी अनेकदा हे माहित करून घेण्याचा प्रयत्न केलाय की, सुशांतचं YRF सोबत काय कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. आता आदित्य यांची चौकशी करत हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला असावा.
काही दिवसांपूर्वीच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं सांगितलं होतं की, सुशांतनं स्वत:हून YRF सोबतचं कॉन्ट्रॅक्ट संपवलं होतं. सोबत तिलाही त्यानं तसं करण्यासाठी सांगितलं होतं. पोलिसांनी रियाचा तो जबाब नोंदवला होता. पोलिसांनी यासंदर्भात आदित्य चोपडांना यासंदर्भात प्रश्न केलेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.







