मुंबई;- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ GPO समोर असणाऱ्या भानुशाली इमारतीचा काही भाग गुरुवारी (16 जुलै) कोसळला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 23 जणांची सुटका करण्यात आली.
फोर्ट भागातल्या या भानुशाली बिल्डिंगला धोकादायक इमारत जाहीर करण्यात आलं होतं.
या इमारतीतल्या 12 भाडेकरूंपैकी 3 कुटुंब इथे पुन्हा राहायला आली होती, आणि ती या दुर्घटनेत सापडल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे.
GPO च्या समोरच्या मिंट रोडवर असणाऱ्या या पाच मजली इमारतीचा एक भाग गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कोसळला कोसळला. अग्निशमन दलाकडून इथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि ते गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होतं.
8 फायर इंजिन्स, 2 रेस्क्यू व्हॅन्स, 1 LLP, 2 टीटीएल, 6 जेसीबी आणि 10 डंपर्सच्या मदतीने अडकलेल्यांची सुटका करण्याचं आणि ढिगारा उपसण्याचं काम करण्यात आलं.
इमारतीच्या दुसऱ्या बाजूला अडकलेल्या 14 जणांना गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने ट्वीटद्वारे दिली.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर श्रीरामुलू म्हणाले की, जगभरात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जागरुक राहण्याची गरज आहे. सत्ताधारी असो वा विरोधक, गरीब असो वा श्रीमंत हा विषाणू कुणासोबतही भेदभाव करू शकत नाही. राज्यातील परिस्थिती पाहता पुढील दोन महिने रुग्ण वाढीचा दर चढाच राहण्याची शक्यता आहे. आता सरकार किंवा मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा आजार फैलावत असल्याचा दावा कुणी करू शकतो. पण आता आपल्याला केवळ देवच वाचवू शकतो.







