नवी दिल्ली(वृत्तसंस्था) – मध्यप्रदेशमधील गुना येथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शेतकरी दाम्पत्याला मारहाण केली आहे. यानंतर दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

या प्रकरणाचा व्हिडीओ ट्विट करत प्रियांका गांधी म्हणाल्या कि, गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला हाच भाजपाचा खरा चेहरा आणि चरित्र आहे , अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच या अन्यायाविरोधात काँग्रेस निकराने लढा देणार, असेही त्यांनी सांगितले आहे.







