पाटना, (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी जमा होत आहे. अनेक रुग्णालये आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णालयांना पुरेशी सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहे.

त्यातच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कोरोना वॉर्डातील आहे. या ट्विटमध्ये प्रियंका गांधी म्हणाल्या – उत्तर प्रदेशातील सरकार चुकीचा प्रचार करीत असल्याचे या कोरोना वॉर्डातील व्हिडीओवरुन समोर येईल.
मेडिकल कॉलेजच्या कोविड वॉर्डात नाल्याचं पाणी भरलेलं आहे. रुग्ण त्रस्त आहेत आणि पाणी काढण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
निशब्द! तीन महिन्यांपासून गरजुंना मदत करणाऱ्या योद्ध्याचा कोरोनाने घेतला जीव
आज गोरखपूरमध्येही कोरोना संक्रमित रुग्णाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी 16 तासांपर्यंत रुग्णवाहिका पाठविण्यात आली नसल्याची बातमी समोर आली होती.







