नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) – राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या विरोधात बंड पुकारणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यवर काँग्रेसने थेट कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन बाजूला हटवले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी तीन मंत्र्यावर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी हा निर्णय जाहीर केला.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदावरुनही हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता गोविंद सिंह डोटासरा यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. सचिन पायलट यांच्यासह तीन मंत्र्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला.







