भुसावळ ;- एका १९ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती . याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली होती . मात्र मारेकर्यांना गावठी कट्टा पुरविणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे . आरोपी सचिन भीमराव वाघ (वय २८ राहणार भुसावळ ह.मु.नांदुरा जिल्हा बुलढाणा) असे त्याचे नाव आहे .

गावठी कट्टा पुरविणार्या आरोपी नांदुरा असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक व बाजारपेठचे कर्मचारी गुन्ह्यातील फरार आरोपीच्या शोधकामी नांदुरा येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन रात्री उशिरा नवव्या आरोपीस शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
फिर्यादी आदित्य संजय लोखंडे (वय-१९ न्यू आंबेडकर नगर,भुसावळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार भूषण सपकाळे याने फोन करून बोलावून कब्रस्थान जवळ घेऊन गेला. त्या ठिकाणी अतिष खरात, हंसराज, गोलू उर्फ राजन खरात,चिन्न,सूरज, गोविंदा,कपिल कासे,राहुल धम्मा सुरवाडे यांनी मिळून फायटरने तसेच चापट्या बुक्यांनी मारहाण केली.तसेच गावठी कट्ट्याने गोळीबार करून गोळी तरुणाच्या कानाला, डोक्याला लागली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाली आहे. यातील गुन्ह्यात पुरविण्यात आलेल्या गावठी कट्ट्या बाबतचा फरार (नववा) आरोपी सचिन भीमराव वाघ (वय २८ राहणार भुसावळ ह.मु.नांदुरा जिल्हा बुलढाणा) मध्ये असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली होती. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे पोकॉ.रविंद्र पाटील,कमलाकर बागुल,दादाभाऊ पाटील, दिपक चौधरी वाहन चालक तसेच बाजारपेठचे पोकॉ विकास सातदिवे यांनी नांदुरा जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले. तसेच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी यांच्या ताब्यात दिले.







