जळगाव ;- तरुणीकडे उसनवारीचे पैसे मागितल्याचा राग येऊन तरुणाने तरुणीची सोशलमिडीयावर बदनामी केल्यामुळे तरुणांसह ११ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे फेसबुकवर श्याम भानूदास पाटील नावाचा तरूणीचा मित्र आहे. त्याने मैत्रीच्या संबंधातून तरूणीकडून ४ हजार ९०० रूपये उसनवारीने घेतले होते. त्यातील २ हजार रूपये तरूणीला परत केले. उर्वरित २ हजार ९०० रूपये मागितले असता तरूणाने फेसबुक व व्हॉटस्ॲपवर खंडणीखोर असे म्हणून बदनामी करण्यास सुरूवात केली. त्या पोस्टला प्रतिसाद देत श्याम पाटीलच्या मित्रांनी देखील खंडणीखोर समाजसेविका असे कमेंट टाकू लागले. तसेच एका मुलीने स्वत: फेसबुक लाईव्ह करून तिच्या प्रियकराचा फोटो टाकून संसार मोडला व १० हजार रूपयाची घेतले असे सांगून तरूणीची बदनामी केली. हा सर्व प्रकार ५ जुलै ते १२ जुलै २०२० दरम्यान घडलेला आहे. तरूणीच्या फिर्यादीवरून श्याम भानुदास पाटील रा. फैजपूर ता.यावल, स्नेहल सोनी रा. मुंबई, प्रथमेश कांबळे रा. मुंबई, सिमा गायकवाड रा. तांबे, अजय जाधव, करूणा सोनवणे, प्रज्ञा तांबे, राहूल भालेराव, कोमल पगारे, संदीप आराख आणि कांचन बनसोडे (पुर्ण नाव माहिती नाही) या ११ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.