पहूर , ता. जामनेर ;– तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे आपले वडील आणि भावाचा खून करणार्या आरोपीला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जामनेर तालुक्यातील नांद्रा प्रलो येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला पहूर पोलिसांनी न्यायाधिश सचिन हवेलीकर यांच्या न्यायालयासमोर हजर केले. सरकारी वकील सौ. कृतिका भट यांनी पोलिसांतर्फे युक्तिवाद केला. यावर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांद्रा प्र. लो. येथे शनिवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या पित्याची व लहान भावाची मोठ्या भावाने धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पहूर पोलिसांनी आरोपी निलेश आनंदा पाटील यास शिताफीने अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .आज त्यास जामनेर न्यायालयासमोर हजर केले असता २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, आज अतिशय शोकाकुल वातावरणात मृत पिता-पुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.