जळगाव, ;– महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ऑनलाईन पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानुसार CSC सेंटर व बँकांकडे उपलब्ध सुविधेनुसार प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घेवुन योजनेचा लाभ घेत आहेत.
परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घेतले नाही, अशा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांचे नजिकच्या CSC सेंटरवर किंवा त्यांचे संबधीत बँक शाखेस तात्काळ संपर्क करुन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. म्हणजे प्रसिद्ध झालेल्या यादीतील सर्व शेतकऱ्यांना संबंधीत बँकांमार्फत कर्जमुक्ती रकमांचा त्वरीत लाभ देण्याची कार्यवाही करुन सदर योजना पुर्ण केली जाईल व पुढील विस्तारीत कर्जमुक्ती योजना सुरु करण्यास अधिक विलंब होणार नाही.
तसेच सदर योजनेच्या मुख्य उद्देशानुसार योजनेस पात्र असलेले सर्वच शेतकरी सन 2020-21 या हंगामामध्ये पीक कर्ज घेण्यासही पात्र ठरणार आहेत. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.