नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना रुग्णांवर उपचार करताना दिल्लीच्या एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टर असीम गुप्ता यांचे नधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या वतीने एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश आज सुपूर्त करण्यात आला.

यासंबंधात बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे की, गुप्ता हे लोकांचे डॉक्टर होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यांनी धोका पत्करून लोकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले.
डॉक्टर गुप्ता यांना आपण आज परत आणू शकत नसलो तरी सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे, असेही
केजरीवाल यांन ट्विटरवर नमूद केले आहे. डॉ गुप्ता हे दिल्लीच्या एलएनजीपी रुग्णालयात कार्यरत होते. त्यांना करोनाची लागण झाल्याची बाब 6 जून रोजी उघड झाली. त्यातच त्यांचे निधन झाले.







