पुणे (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) प्रवास करत असताना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. यावेळी शरद पवार Sharad Pawar यांच्या ताफ्यातील पोलिसांची एक गाडी जवळपास पलटी झाली. त्यामुळे थोड्या वेळासाठी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जात असताना हा प्रकार घडला. यावेळी गाड्यांच्या ताफ्यातील एक पोलीस जीप नियंत्रण सुटून रस्त्यावर जवळपास पलटी झाली. मात्र, सुदैवाने या जीपच्या चालकाला फारशी दुखापत झालेली नाही. तर शरद पवार यांची गाडीही सुरक्षित असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.







