नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मोसर बेअर सोलर कंपनीने केलेल्या बॅंकेच्या 787 कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण पथकाने उद्योगपती रातूल पुरी यांचे निवासस्थान आणि कार्यालये अशा सात ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांचे रातुल हे भाचे आहेत.

रातुल पुरी यांचे वडील दीपक पुरी यांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुरी यांच्या कंपनीला कर्ज दिल्याने पंजाब नॅशनल बॅंकेला 787 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्याबाबतचा गुन्हा गुरूवारी नोंदवण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट घालून हे छापासत्र राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.







