श्रीनगर (वृत्तसंस्था) – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर शुक्रवारी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि स्थानिक लहान मुलाचा मृत्यू झालाय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी अनंतनागमधील बिजबेहरा या ठिकीणी सीआरपीएफच्या 90 बटालियनवर हल्ला केला. या हल्ल्यात एका 4 वर्षांचा मुलगा आणि जवान जखमी झाले होते. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरामध्ये चकमक सुरू झाली. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने त्याठिकाणचा संपूर्ण परिसर सील केलाय. या भागात लपलेल्या सर्व दहशतवाद्यांना हुडकून लावण्याचं काम सुरक्षादलाने हातात घेतलंय.
यापूर्वी त्रालमध्ये झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झालेत. गुरुवारी सुरक्षा दर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू झाली होती. या चकमकीनंतर 2 दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षादलांनी ताब्यात घेतलेत.







