नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आजकाल मनोरंजनासाठी लोक फक्त टेलिव्हिजनवरच अवलंबून राहत नाही. आता बाजारात अनेक मनोरंजनाचे अॅप्लिकेशन उपलबध आहेत. यातच एक आहे ते ‘टिकटॉक’. टिकटॉकची वाढती लोकप्रियता पाहता शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोघेही याला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता याच शर्यतीत ‘युट्यूब’नेही उडी घेतली आहे. युट्यूब एका नवीन फिचरचे टेस्ट करत आहे. ज्याद्वारे वापरकर्ते 15 सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतील.

या फिचर बद्दल माहिती देताना युट्यूबने सांगितलं की, मल्टी सेगमेंट व्हिडीओ फीचरद्वारे वापरकर्त्यांना शॉर्ट व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. मात्र युट्यूबचा हा मल्टी सेगमेंट व्हिडीओ फीचर सध्या तरी मर्यादित वापरकर्त्यांसाठी Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. क्रिएटर या फीचरद्वारे एकाहून अधिक व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतील.
असं काम करेल हे फिचर
शोर्ड व्हिडीओसाठी मोबाईल अपलोड फ्लो मध्ये create a vieo वर टॅब करा. येथे टॅब करून बटन होल्ड केल्यास रेकॉर्डिंग सुरू होईल. रेकॉर्डिंग झाल्यानंतर बटन रिलीज करून स्टॉप करायचं आहे. असं पुन्हा रिपीट केलास तुम्ही 15-15 चे व्हिडीओ तयार करू शकता.







