मुंबई (वृत्तसंस्था) –कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसीवीर, फॅबीपीरावीर आणि टॅझीलोझुमा या औषधांची उपलब्धता जूनअखेरीस केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना संक्रमणाचा विळखा दिवसागणिक वाढत असताना नागरिकांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब म्हणावी लागेल.

रेमडेसीवीर, फॅबीपीरावीर या औषधांचा वापर कोरोना बाधीत रूग्णांवर उपचारालाठी या आधीही केला जात होता. मात्र काही मोठी शहरं सोडल्यास उर्वरीत ठिकाणी या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचं पहायला मिळालं. यासाठी कोरोनावरील ही औषध प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध होतील, असं आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये कोरोनाचं संक्रमण नक्की किती नागरिकांना झालं हे तपासण्यासाठी एन्टीबाॅडीज चाचणी करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात रूग्णवाहिकांकडून नागरिकांची लूट होण्याचा प्रकार पहायला मिळत होता. यासाठी खाजगी रुग्णवाहिका आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. किलोमीटरचा दर निश्चित करूनच त्याच माफक दराने आता रूग्णवाहिकेचे पैसेही मोजावे लागणार आहेत.
राहुल गांधींनी पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व करावं, पक्षातील ‘या’ नेत्याची मागणी
कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी शासनाकडून ‘एवढा’ निधी मंजूर
सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या.
इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!
रेल्वे कधी रुळावर येणार?, रेल्वे बोर्डानं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय







