• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद


महादेव हॉस्पिटलच्या युरो तज्ज्ञांचे यश; १० वर्षांपासून शरीरात असलेला स्टेन्टही काढला

जळगाव : मुतखड्याच्या उपचारादरम्यान शरीरात बसविण्यात आलेला स्टेन्ट तब्बल दहा वर्षे तसाच राहिल्याने निर्माण झालेली गुंतागुंत महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरोलॉजी तज्ज्ञांनी यशस्वीरीत्या दूर केली. ७० वर्षीय वृद्ध रुग्णाच्या मूत्राशयाच्या परिसरात तयार झालेले प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे आणि दहा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला स्टेन्ट अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे अवघ्या दोन टाक्यांच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील ७० वर्षीय रुग्णावर सुमारे दहा वर्षांपूर्वी मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी उपचाराचा एक भाग म्हणून मूत्रमार्गात स्टेन्ट बसविण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर साधारण महिनाभराने हा स्टेन्ट काढणे आवश्यक होते. मात्र, रुग्णाकडून तो काढण्याचे राहून गेले. परिणामी, तब्बल दहा वर्षे हा स्टेन्ट शरीरातच राहिला. कालांतराने त्याभोवती खडे तयार होऊन रुग्णाला त्रास होऊ लागला.

महोदव हॉस्पीटलमध्ये रूग्ण दाखल
या त्रासामुळे रुग्णाने महादेव हॉस्पिटलमधील युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण या तज्ज्ञांकडे तपासणी केली. आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर मूत्राशयाच्या परिसरात प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे आणि जुना स्टेन्ट असल्याचे निदान झाले. रुग्णाचे वय लक्षात घेता तसेच दीर्घकाळ शरीरात राहिलेल्या स्टेन्टमुळे निर्माण झालेली गुंतागुंत पाहता काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले.त्यानुसार डॉक्टरांनी पीसीसीएलटी (पर्क्युटेनिअस सिस्टोलिथोट्रेप्सी) आणि पीसीएनएल (पर्क्युटेनिअस नेफ्रोलिथोटे्रप्सी)या आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींचा वापर केला. अत्यंत कौशल्याने दोन्ही मोठे खडे फोडून बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर दहा वर्षांपासून शरीरात असलेला स्टेन्टही यशस्वीरीत्या काढण्यात आला. या संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी केवळ दोन टाके देण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून त्याच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.

यांनी केली शस्त्रक्रिया यशस्वी
ही शस्त्रक्रिया महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरो विभागप्रमुख डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी, डॉ. शुभम चौधरी, डॉ. आर.के. तिवारी, डॉ. सुष्मीता रे या तज्ज्ञांनी यशस्वी केली.

मूत्रमार्गातील स्टेन्ट हा कायमस्वरूपी उपचार नसतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीत तो काढणे किंवा बदलणे अत्यंत आवश्यक असते. स्टेन्ट काढण्यास विलंब झाल्यास त्यावर खडे तयार होणे, संसर्ग होणे तसेच मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्यासारख्या गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर नियमित तपासणी करावी आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

– डॉ. हर्षद चव्हाण, महादेव हॉस्पीटल जळगाव.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
खान्देश

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 28, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
खान्देश

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

November 28, 2026
कजगाव गोळीबार प्रकरणाचा छडा; मुख्य आरोपीला धुळ्यातून अटक, तर साथीदारही जाळ्यात
खान्देश

कजगाव गोळीबार प्रकरणाचा छडा; मुख्य आरोपीला धुळ्यातून अटक, तर साथीदारही जाळ्यात

November 28, 2026
जिल्हा मध्यवर्ती बँकेला आरबीआयकडून साडेतीन लाखांचा दंड
खान्देश

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

November 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 28, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

November 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon