
शिरसोली ( प्रतिनिधी ) – बारी समाज माध्यमिक विद्यालय 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला सांस्कृतिक विभाग प्रमुख जी. बी. काळे यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले त्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो त्याचे स्मरण म्हणून संवैधानिक मूल्य रुजवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.

संविधान सभा संविधान सभेची स्थापना निर्मिती याविषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ भाई पटेल यांनी केलेल्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली.
शाळेतील उपशिक्षिका श्रीमती दिपाली पाटील यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री निलेश खलसे शाळेचे मुख्याध्यापक आर एस आंबटकर, आर के पाटील,एस ए भदाणे एस के काटोले ललित पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.









