जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा एनएसयूआयच्यावतीने जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे राज्यात लॉकडाउन काळामधील तीन महिन्यांचे 100 युनिट प्रतिमहिना असे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी केली.
तीन महिन्यांपासून राज्यातील सर्व उद्योगधंदे, व्यापार, नोक-या, शेती ठप्प झाल्यामुळे राज्यातील गरीब जनतेला आर्थिक फटका बसला आहे. नागरिकांचे 100 युनिट प्रतिमहिना वीज बिल माफ झाल्यास नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल. महाविकास आघाडी सरकार सामान्यांचे सरकार असल्याची भावना आहे. त्यामुळे कोरोना महामारीमध्ये सापडलेल्या गरीब जनतेला दिलासा देणारे निर्णय सरकारने द्यावे असे अपेक्षित आहे . लॉक डाऊन मधील परिस्थिती बघता सरकारने नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
राज्यातील नागरिकांना शासनामार्फत आश्वासित करण्यात आलेले होते की लॉक डाऊन मध्ये प्रत्यक्ष विजेचे बिल आकारता येत नसले तरी जानेवारी फेब्रुवारी मधील विज बिलाच्या सरासरी असे बिल लॉक डाऊन मधील मार्च-एप्रिल-मे महिन्यांचे येईल . परंतु तसे झाले नाही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमान कमी असल्यामुळे विजेचा वापर देखील कमी होतो व त्या अनुषंगाने विज बिल कमी येते. ॉक डाऊन असल्यामुळे व तापमान जास्त असल्यामुळे मार्च एप्रिल व मे या तीन महिन्यांमधील नागरीकांचा विजेचा वापर जास्त झालेला आहे परंतु त्या काळामध्ये नागरिकांना आर्थिक फटका देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. ही मागणी मान्य न झाल्यास सामान्यांच्या हितासाठी सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असेही देवेंद्र मराठे यांनी सांगितले.