नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-चीन तणावाबाबत सल्ला दिला. पंतप्रधानांनी चीनला फायदा होईल, असे वक्तव्य करून नये, असे मनमोहन सिंग म्हणाले होते.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. मनमोहनसिंग यांना सैन्याचा अपमान करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
नड्डा म्हणाले, ते बहुतेक विषयांवर आपले ज्ञान निश्चितपणे सांगू शकतात, परंतु पंतप्रधान कार्यालयाच्या जबाबदाऱ्या त्यापैकी एक नाहीत. मनमोहन हे त्याच पक्षाचे आहेत ज्यांनी हजारो एकर जमीन चीनला दिली.
डॉ. मनमोहनसिंग त्याच पक्षाचे आहेत. ज्यांनी 43 हजार कि.मी.पेक्षा जास्त भारतीय भूभाग चीन’ला दिला आहे. यूपीएच्या काळात रणनीतिक आणि प्रादेशिक आत्मसमर्पण कोणत्याही लढाईशिवाय केले गेले, असे नड्डा म्हणाले.
शेवटी जेपी नड्डा म्हणाले, ‘प्रिय डॉ. सिंह आणि कॉंग्रेस पार्टी, कृपया आमच्या सैन्याचा वारंवार आणि पुन्हा अपमान करणे थांबवा आणि त्यांच्या शौर्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे बंद करा.’ आपण हे एयर स्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइक नंतर सुद्धा केले होते. कृपया राष्ट्रीय एकतेचा खरा अर्थ समजून घ्या, विशेषत: अशावेळी.