• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१५ वर्षीय मुलीवर अत्याचार; गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
१५ वर्षीय मुलीवर अत्याचार; गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

इंदापूर येथील तरुणाविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत पोक्सो कायद्यान्वये गुन्हा

मेहुणबारे (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील एका तरुणाविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत मूळ गावी शेतमजुरीचे काम करीत होती. याच परिसरात शेतमजुरीसाठी येणाऱ्या संशयित तरुणाची तिच्याशी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी संशयिताने पीडितेला चॉकलेट खाण्यास दिले आणि शेजारील उसाच्या शेतात नेऊन तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवले. तसेच, तिला आवडत असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर संबंधित ठिकाणी संशयिताने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, पीडितेचे आई-वडील मजुरीच्या कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथे गेले होते. तेथे असताना ७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर पुढील उपचारासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता पीडिता गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), ६५(१), ६४(२)(आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.


 

 

Tags: mehunbare police steshan news
Previous Post

अल्पवयीन मुलीला हात लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१५ वर्षीय मुलीवर अत्याचार; गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड
क्राईम

१५ वर्षीय मुलीवर अत्याचार; गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

November 10, 2026
तापी नदीपात्रात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेला मृतदेह, ओळख पटविण्याचे आवाहन
क्राईम

अल्पवयीन मुलीला हात लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

November 10, 2026
यावलमध्ये गळफास घेऊन ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; परिसरात हळहळ
क्राईम

यावलमध्ये गळफास घेऊन ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; परिसरात हळहळ

November 9, 2026
यावल ग्रामीण रुग्णालयाची जिल्हास्तरीय पथकाकडून झाडाझडती! आरोग्य सुविधांचा घेतला सविस्तर आढावा
खान्देश

यावल ग्रामीण रुग्णालयाची जिल्हास्तरीय पथकाकडून झाडाझडती! आरोग्य सुविधांचा घेतला सविस्तर आढावा

November 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१५ वर्षीय मुलीवर अत्याचार; गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

१५ वर्षीय मुलीवर अत्याचार; गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

November 10, 2026
तापी नदीपात्रात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेला मृतदेह, ओळख पटविण्याचे आवाहन

अल्पवयीन मुलीला हात लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

November 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon