पोलिसांकडून शोध सुरू असतानाच ६५ वर्षीय आरोपीचा रेल्वेखाली मृत्यू
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका ६५ वर्षीय इसमाविरुद्ध चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना काल, दि. ९ नोव्हेंबर रोजी घडली होती. शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीला संबंधित इसमाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप असून, याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस संबंधित इसमाचा शोध घेत होते. मात्र, रात्रीच्या सुमारास संबंधित इसमाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय, आरोपीने हे टोकाचे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार आहे.








