यावल ( प्रतिनिधी ) – यावल शहरातील महाराणा प्रताप नगर परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. ८) रात्री घडली.


नीलकंठ ऊर्फ सोनू बापू कोळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नीलकंठ कोळी यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.या घटनेप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनेची माहिती घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मृत नीलकंठ कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे महाराणा प्रताप नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








