• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

चाळीसगाव (प्रतिनिधी):- गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विशेष मार्गदर्शन व साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यासोबतच पोलिसांनी तांत्रिक तपास करून शोधून काढलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे १२ हरवलेले मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले.

या कार्यक्रमास चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील तसेच विविध गावांमधील ग्राम सुरक्षा दलाचे सुमारे ३५० ते ४०० सदस्य या वेळी उपस्थित होते.

ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप

गावातील शांतता, सुरक्षितता राखणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते टी-शर्ट, शिट्ट्या व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. ग्राम सुरक्षा दल हा पोलीस आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे सदस्यांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती वेळेत पोलिसांना द्यावी, तसेच कोणताही कायदा हातात न घेता जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.

१.२० लाखांचे १२ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द

चाळीसगाव ग्रामीण गुन्हे शोध पथकाने शासनाच्या ‘CEIR’ पोर्टलच्या माध्यमातून शोधलेले १ लाख २० हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल फोन मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन

दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाताना नागरिकांनी घराची व मालमत्तेची काळजी घ्यावी, दागदागिने व रोख रक्कम सुरक्षित ठेवावी आणि घराबाबत शेजाऱ्यांना कल्पना द्यावी, तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, राहुल राजपूत, श्रीमती भारती काळे, अंमलदार महेंद्र मराठे, संदीप पाटील, दीपक गुंजाळ तसेच गुन्हे शोध पथकाचे युवराज नाईक, संदीप पाटील, विजय पाटील, बाळू बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/11/WhatsApp-Video-2026-11-06-at-08.04.48.mp4

Tags: चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
Previous Post

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026
आ. राजूमामा भोळे भरणार सोमवारी उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती
खान्देश

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर!

November 6, 2026
भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
खान्देश

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!