डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी जयंती उत्साहात
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे भगवान धन्वंतरी जयंती भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.


यावेळी पारंपारीक पध्दतीने भगवान धन्वंतरी पुजन व स्तवन करण्यात आले.उपस्थीतांनी प्रार्थना करतांना आरोग्य सेवेचा संकल्प केला. प्रारंभी भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सामूहिकरीत्या धन्वंतरी स्तवनाचे पठण करून सर्वांना उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आराध्य दैवत असून आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा मार्ग आहे, याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्वांना भगवान धन्वंतरी जयंती व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.आरोग्यसेवेप्रती निष्ठा, आयुर्वेदाच्या परंपरेचे जतन आणि समाजाला निरोगी जीवनाची दिशा देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.









