जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज आलेल्या प्राप्त अहवालानुसार आज नव्याने पुन्हा 3 रुग्णांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालात शिरसोली प्र. बो. येथील 80 वर्षाचे वृद्ध, 52 वर्षाची महिला व 21 वर्षाचा तरुण यांचा समावेश आहे.
आता शिरसोलीच्या दोन्ही गावातील रुग्णांची संख्या 26 वर जाऊन पोहचली आहे.
शिरसोली ग्रामपंचायत व ग्रामस्थानी एक ठराव मंजूर करून गावात आठवडाभर जनताकर्फ्युला उद्यापासून दि. 23 जून ते 30 जून पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता शिरसोलीतील इतर दुकाने बंद राहील.







