शिरसोली ( प्रतिनिधी ) – बारी समाज माध्यमिक विद्यालय येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर होते.

प्रमुख अतिथी प्रभारी पर्यवेक्षक श्री एस ए भदाणे व श्री जी बी काळे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आर एस आंबटकर व प्रमुख अतिथी यांनी प्रथम सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती बी टी ठाकरे मॅडम यांनी केले श्रीमती के आर धांडे मॅडम यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री आधुनिक भारताचे शिल्पकार एक लोहपुरुष तसेच त्यांचे शिक्षण त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खेडा सत्याग्रह बारडोली सत्याग्रह याबद्दल माहिती सांगितली तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे बालपण, शिक्षण व राजकीय प्रवास याबद्दल सखोल माहिती सांगितली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ललित पाटील सर यांनी केले..









