डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे तालुक्यातील गावांमध्ये २६ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर दरम्यान होणार नेत्र तपासणी
जळगाव, ( प्रतिनिधी ) :- गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे रावेर,यावल तालुक्यात यशस्वीतेनंतर सोमवार दि २६ ऑक्टोंबरपासून ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ या विशेष अभियानाला प्रारंभ होत असून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नेत्ररोग तज्ञांची टीम नियुक्त करण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यातील नेत्र तपासणी शिबिरांचे वेळापत्रक:
२६ रोजी धानोरा, मोहरद, बीडगाव,२८ अडावद, सुटकर, खुर्डी, ३० वड्री, मंगरुळा, वडली २ नोव्हें विश्णापूर, अडगाव, विरवाडे,४ नागलवाडी, वराड, गणापूर,१३ चांदसणी, कमलगाव, पंचक,१६ वैजापूर, देन्हारी, उमर्टी,१८ सत्रासेन, लासूर, चौगाव,२० अकुलखेडा, चहार्डी, हातेड,२३ बुधगाव, अनवरदे, वाळसी,२७ कुसुना, वेळोदे, वनेदा,३० खाचगे, कुरवेल, तावसे,२ डिसेंबर: निमगाव, वेले, गरनाड,तर ४ डिसेंबरला कलोबा, कठोरा, वटकर यागावात समारोप केला जाणार आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत
या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावाड, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम् भारसाकळे, डॉ. अभिजीत काकड, डॉ. अनीष कांदळगावकर, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. रिया गोरे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. ऋतुजा चव्हाण आणि डॉ. अश्विनी काकडे.हे डॉक्टर रुग्णसेवेत योगदान देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
दृष्टीदोष व मोतीबिंदूची समस्या असलेल्या चोपडा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी तसेच शिबिराबाबत अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी डॉ. कीर्ती महाजन: ९१३००७४०९३ डॉ. रिया गोरे: ७७१८८१२०७४ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.










