
या सर्व बाल गोपाळांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली.या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज नगर महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री सोनार होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपाध्यक्षा भारती सूर्यवंशी,सचिव निलीमा बच्छाव,प्रभावती कासार,कमलबाई पाटील,मिराबाई पाटील,रत्ना पाटील,भारती सोनवणे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.नागरिकांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले आणि अशा धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांमुळे मुलांमध्ये एकतेची भावना निर्माण होते,असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला राज नगर मधील नागरिक, महिला आणि बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज नगर मधील सर्व महिला भगिनी,पुरुषांचे अनमोल सहकार्य लाभले.








