• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी आणि रांगोळीतून विद्यार्थ्यांनी उलगडले मानवी शरीररचनेचे शास्त्र

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुनवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शरीररचनाशास्त्रातील ज्ञानाचे प्रभावी सादरीकरण केले. शरीररचनाशास्त्र हा वैद्यकीय शिक्षणाचा महत्त्वपूर्ण पाया आहे. या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, अभ्यासातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने अ‍ॅनाटॉमी मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी प्रेझेंटेशन आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी शरीराची रचना, विविध अवयवांची वैशिष्ट्ये आणि त्यांची कार्यपद्धती विविध माध्यमांतून सादर केली. वैज्ञानिक माहितीची सांगड कलात्मकतेशी घालत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचे आणि कल्पकतेचे दर्शन घडविले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अधिक समृद्ध करावे आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी, असे प्रोत्साहन त्यांनी दिले.शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी आणि डॉ. मयुरी चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे विषयाची सखोल समज विकसित होण्यासोबतच विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्ये वृद्धिंगत होतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.‘अ‍ॅनाटॉमी डे’च्या आयोजनामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले. अभ्यासाला कृतीशील आणि सर्जनशीलतेची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शरीररचनाशास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघासाठी २५ ऑक्टोबरला निवड चाचणी

Next Post

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 17, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!