दुष्काळी परिस्थितीत पणन महासंघामार्फत ११७ कोटी रुपये थेट ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
पहूर ( प्रतिनिधी ) – दुष्काळाच्या कठीण प्रसंगात जळगाव जिल्हयातील हजारो ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ११७ कोटी रुपये जमा करून त्यांना मोठा दिलासा देण्याचे काम नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रभावी प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. ३ लाख १७ हजार क्विंटल ऐतिहासिक ज्वारी खरेदी केवळ नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी राज्य सरकारकडून सातत्याने पणन महासंघाच्या मार्फत दिल्ली येथे सातत्याने पाठपुरावा करत दोन वेळा मुदतवाढ मिळवून दिल्यामुळेच शक्य झाली. अन्यथा हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहिले असते.”शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गिरीशभाऊ हेच खऱ्या अर्थाने ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ आहेत, असे गौरव उद्गार राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांनी काढले.


पहूर येथे ‘जय मल्हार ॲरिगेशन’ च्या भव्य उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जामनेर न पा नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री दर्जा प्राप्त मुस्लिम अभ्यास समितीचे सदस्य मुलतानी, कृषी अधिकारी कुर्बान तडवी, प्रदीप लोढा, नगरसेवक अरविंद देशमुख, विजय जगताप, श्याम सावळे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील,
राहुल राठोड, सुरज कवाळ,राजू रिकनोद,धनंजय पांढरे,पंकज थोरात. बाळू पांढरे ,पुंडलिक थोरात, साहेबराव पांढरे, ईश्वर देशमुख यांच्यासह भागातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. तेजस्विनी देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.









