चाळीसगाव : मका, कापूस, हरभरा आणि ज्वारी शासकीय हमीभावाने खरेदी करावी यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी आमदारांसह त्यांचे २२ पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात जमावबंदी असून, राजकीय मेळावे, सभा, कार्यक्रम घेण्यास शासनाने मनाई केली आहे. मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी धान्याच्या हमीभावासाठी शनिवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास सिग्नल चौकात कार्यकर्त्यांची गर्दी जमवून आंदोलन केले.








