तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


जळगाव : शहरातील मयूर कॉलनी, पिंप्राळा परिसरातील ५८ वर्षीय व्यक्तीचा तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात BNSS कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृताचे नाव सुनील सांडू इंगळे (वय ५८) असे आहे. ते मयूर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव येथे राहत होते.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
पोलिसांच्या नोंदीनुसार, सुनील इंगळे यांना प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी जळगाव येथील विनिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, २४ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला.
नातेवाइकांनी त्यांना मृतावस्थेत जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ. जितेंद्र राजपूत करीत आहेत.









