मुंबई (वृत्तसंस्था) – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यायची हे भाजपचं ठरत नव्हतं. राज्यसभेसाठी अनेक दिग्गज नेते आग्रही होते. परंतू उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन बाकीच्यांचा पत्ता कट केला आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर नव्याने भाजपात आलेल्या उदयनराजेंना पक्ष काय संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजेंचा 5 महिन्यांचा वनवास संपला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित केली आहे. तसंच केंद्रिय मंत्री रामदास आठवलेंनाही पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे.भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अमर साबळे आणि संजय काकडे यांचा पत्ता कट केला आहे. किंबहुना त्यांना भाजपने डच्चू दिला आहे.दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावाची शिफारस प्रदेश भाजपने केल्याची माहिती आहे.