जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज आलेल्या प्राप्त अहवालानुसार आज नव्याने पुन्हा ३ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .

आता शिरसोलीच्या दोन्ही गावातील रुग्णांची संख्या २२ वर जाऊन पोहचली आहे .अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिरसोली मध्ये कोरोनाचा शिरकाव दिवसन दिवस जास्त वाढत असुन याबाबत दोन्ही गावातील ग्रामपंचायत व नागरिक सात दिवस संपूर्ण शिरसोली बंद पुकरणार आहे.
शिरसोली ग्रामपंचायत व लोकांनी एक ठराव मजूर केला की, शिरसोलीत रुग्णसंख्या वाढल्यामुळे दि. २३ जून ते ३० जून शिरसोली बंद राहील.







