भाजपच्या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत पाद्यपूजन; गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त
जळगाव (प्रतिनिधी )- आज, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त चिमुकले राम मंदिर येथे वंदनीय परमपूज्य श्री दादाजी महाराज जोशी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. गुरु परंपरेप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन लाडके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर गुरुपौर्णिमेनिमित्त विविध साधू-संत, धर्मगुरू, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील गुरुवर्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून जळगावात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचे पाद्यपूजन करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या संयोजिका रेखाताई वर्मा, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई, नगरसेवक विशाल भोळे बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ, जिल्हा सहसंयोजिका नंदिनीताई दर्जी, भाग्यश्री चौधरी, उषाताई, नीलाताई चौधरी पाठक, राजश्री शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
> “गुरुंचा सन्मान ही भारतीय संस्कृतीची परंपरा असून त्यांच्या मार्गदर्शनातूनच समाजाला योग्य दिशा मिळते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
— राजूमामा भोळे, आमदार, जळगाव शहर









