जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज आलेल्या प्राप्त अहवालानुसार आज नव्याने पुन्हा ३ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . आता शिरसोलीच्या दोन्ही गावातील रुग्नाची संख्या १९ वर जाऊन पोहचली आहे . यात एका डॉक्टरांचा समावेश असून एक ६५ वर्षीय महिला आणि १८ वर्षीय तरुणाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.