मागील भिंत फोडून बँकेत प्रवेश; सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरसोद फाटा येथे असलेल्या एचडीएफसी बँकेत सोमवारी (दि. २१) मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. दोन अज्ञात व्यक्तींनी बँकेची मागील भिंत फोडून आत प्रवेश केला. मात्र, लॉकर फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बँकेचा सायरन वाजल्याने ते घटनास्थळावरून पळून गेले.

ही घटना रात्री १२.५० ते १.०० वाजेच्या सुमारास घडली. सायरनचा आवाज ऐकताच नशिराबाद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे संकलित केले.
घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.









