लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप; जखमींवर उपचार
एरंडोल ( प्रतिनिधी ) – एरंडोल शहरातील उत्तमनगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी चार जणांविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी सुमारे ४ वाजता फिर्यादी भीमा गोकुळ बरेला (वय ३२, रा. उत्तमनगर, एरंडोल) हे आपल्या भावासोबत परिसरातील किराणा दुकानाकडे जात असताना वाद झाला. त्यानंतर चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
या प्रकरणात सुरेश मांगीलाल बरेला, सुभाष उर्फ टकल्या कालूराम बरेला, राजू मांगीलाल बरेला आणि मांगीलाल बरेला (सर्व रा. उत्तमनगर, एरंडोल) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, वादादरम्यान एका संशयिताने लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून फिर्यादीसह इतर काही जणांना मारहाण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. जखमींवर उपचार करण्यात आले असून घटनेचा अधिक तपास एरंडोल पोलीस करत आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक दत्तात्रय ठाकरे करीत आहेत.









