पारोळा, जामनेर, यावल आणि रावेरमध्ये दुचाकी चोरी; चाळीसगावात घरफोडीची नोंद
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गेल्या काही दिवसांत पारोळा, जामनेर, यावल आणि रावेर येथे स्वतंत्र चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना समोर आली आहे. सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.


पारोळा शहरातील राजीव गांधी नगर परिसरातून २ ते ३ जुलैदरम्यान घरासमोर उभी असलेली सुमारे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणावरून २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.









