जामनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील नाचणखेडा भागातील एक रुग्ण डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होता उपचार सुरू असतानाच आम्हाला खाजगी हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून नातेवाईकांनी सुट्टी घेतली मात्र संबंधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याआधीच दगावला त्यानंतर 14 जुन रोजी बऱ्याच लोकांच्या संगतीने अंत्यविधी करण्यात आले
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील बावीस लोकांचे नावे पहुर च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दिले हे 22 लोक विलग करण्यात आले मात्र मात्र राजकीय दबावाला बळी पडून अधिकाऱ्याने 22 लोकांना दिनांक 15 रोजी सुट्टी दिली सध्या या 22 पैकी सात लोक पॉझिटिव असल्याचे निदान झाले आहे
दरम्यानच्या काळात या 7 पॉझिटिव रुग्णामुळे गावात बरेच लोक संक्रमित झाली असण्याची शक्यता आहे या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी खुलासा जनतेसमोर करावा, अशी मागणी अरविंद देशमुख यांनी केली आहे
स्वाब घेतलेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्यात येणार नाही , असे सांगून काही अधिकारी संभ्रम का निर्माण करीत आहेत असा सवालही अरविंद देशमुख यांनी प्रशासनाला केला आहे