• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; स्थानिक गुन्हे शाखेला अपयश?

जळगाव ( प्रतिनिधी ) –जळगाव तालुका पोलीस ठाण्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांना मोठा आळा घालत अवघ्या काही दिवसांत १० गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत ५ अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करत ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना ही उल्लेखनीय कामगिरी तालुका पोलिसांनी केली असून, अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेला अपेक्षित यश मिळत नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगू लागली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-09-at-18.48.58.mp4

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाढत्या घरफोडीच्या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव तालुका पोलीस ठाण्याला गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी स्वतंत्र पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि संशयितांवर पाळत ठेवण्याचे नियोजन केले.

गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी (वय २६, रा. तांबापुरा, जळगाव), दीपक बापू पाटील (वय २३, रा. पंचशील नगर, तांबापुरा), राजेश माणिक राठोड (वय २४, रा. तांबापुरा), सुमित संजय कोळी (वय १९, रा. रामेश्वर कॉलनी) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४, रा. तांबापुरा) यांना ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपींनी ९ घरफोडी आणि १ मोटारसायकल चोरी अशा एकूण १० गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल आणि २ लाख रुपयांच्या चार मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टोळीचा मुख्य सूत्रधार गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ११, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १ आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात १, असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू केले होते. मात्र तालुका पोलिसांनी त्याच्यासह संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येडले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे तसेच वाहन चालक पोलीस हवालदार अशोक पाटील आणि पंकज देशमुख यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली.

तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाढत्या घरफोडींच्या घटनांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांमध्ये पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात जळगाव तालुका पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि प्रभावी तपासाची ही कारवाई जिल्ह्यात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प
1xbet russia

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
महिला दिनानिमित्त योग शिबीर, मॅरेथॉन, आरोग्य तपासणी
1xbet russia

ऑपरेशन ‘शोध’मध्ये जळगाव पोलिसांना मोठे यश; ३६ बेपत्ता व्यक्तींना कुटुंबीयांच्या स्वाधीन

July 9, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

July 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon