भावेश वाणी यांच्यावर पुण्यात आज अंत्यसंस्कार
जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरसोली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


शिरसोलीचा तरुण काळाच्या पडद्याआड
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी भावेश मोहन वाणी (वय ३३) हे नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास होते. मोशी येथील दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
आज पुण्यात अंत्यसंस्कार
दिवंगत भावेश मोहन वाणी यांच्यावर गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी रात्री १० वाजता पुण्यातील रुपीनगर स्मशानभूमी, निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
भावेश वाणी यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.









