• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

दुर्लक्ष करणाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाईचा इशारा; सीईओ करिश्मा नायर यांची कठोर भूमिका

जळगाव ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या आणि अपूर्ण अवस्थेत असलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. कामात दिरंगाई, टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिला.

पाचोरा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी एस. एस. मुंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अपूर्ण घरकुलांचा सविस्तर आढावा

बैठकीत पाचोरा तालुक्यातील गावनिहाय मंजूर, पूर्ण आणि अपूर्ण घरकुलांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पहिला व दुसरा हप्ता मिळूनही अपूर्ण राहिलेल्या घरकुलांची कारणे तपासण्यात आली. तसेच अतिक्रमण, जागेच्या समस्या किंवा इतर कारणांमुळे रखडलेल्या प्रकरणांवरही चर्चा करण्यात आली.

लाभार्थ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश

करिश्मा नायर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रत्येक लाभार्थ्याशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या. महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून अडथळे दूर करून घरकुलांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

नियमित होणार प्रगतीचा आढावा

घरकुलांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत, कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जाईल. अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिला.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

प्रसूतीनंतर नवजात बाळाला नाल्यात टाकल्याप्रकरणी महिलेला तीन वर्षांची शिक्षा

Next Post

मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला दिनानिमित्त योग शिबीर, मॅरेथॉन, आरोग्य तपासणी
1xbet russia

ऑपरेशन ‘शोध’मध्ये जळगाव पोलिसांना मोठे यश; ३६ बेपत्ता व्यक्तींना कुटुंबीयांच्या स्वाधीन

July 9, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

July 9, 2026
मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मोशी दुर्घटनेत शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

July 9, 2026
घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
1xbet russia

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

July 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला दिनानिमित्त योग शिबीर, मॅरेथॉन, आरोग्य तपासणी

ऑपरेशन ‘शोध’मध्ये जळगाव पोलिसांना मोठे यश; ३६ बेपत्ता व्यक्तींना कुटुंबीयांच्या स्वाधीन

July 9, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

July 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon